मुख्य सामग्रीवर जा
महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

महामंडळ योजना (Corporation Schemes)

१. बीज भांडवल कर्ज योजना (२५%) — Seed Capital / Margin Money Loan Scheme

या योजनेंतर्गत महामंडळ प्रकल्प खर्चाच्या २५% बीज भांडवल म्हणून लाभार्थ्यास उपलब्ध करून देते. उर्वरित ७५% रक्कम राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज म्हणून प्राप्त होते.

तपशीलमाहिती
प्रकल्प मर्यादारु. ५,००,००० पर्यंत
महामंडळ हिस्सा२५% बीज भांडवल
बँक हिस्सा७५% कर्ज (राष्ट्रीयकृत बँक)
व्याजदरवार्षिक ४%
परतफेड कालावधी६० मासिक हप्ते (५ वर्षे)
पात्र व्यवसायकिरकोळ दुकान, दुग्ध व्यवसाय, पशुपालन, व्यावसायिक सेवा, वाहतूक व इतर
वय मर्यादा१८ ते ५५ वर्षे
उत्पन्न मर्यादारु. १,००,००० वार्षिक (कुटुंबिक)

२. थेट कर्ज योजना — रु. १,००,००० (Direct Loan Scheme)

लहान फिरत्या व्यवसायासाठी सुलभ वित्तपुरवठा. संपूर्ण कर्ज रक्कम शासन निधीतून. नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी शून्य व्याज.

तपशीलमाहिती
कर्ज रक्कमरु. १,००,००० (१०० % शासन निधी)
व्याजदरशून्य (नियमित परतफेडीवर); थकबाकीवर ४% दंड
वितरण पद्धतदोन हप्त्यांत — रु. ७५,००० प्रथम; रु. २५,००० ३ महिन्यांनंतर
परतफेड४८ मासिक हप्ते (रु. २,०८५ प्रतिमाह); वितरणानंतर ९० दिवसांनी सुरू
लाभार्थी योगदानशून्य
जामीनदार२ आवश्यक (१ शासकीय/निमशासकीय कर्मचारी — ८+ वर्षे सेवा शिल्लक)
पात्र व्यवसाय३८ प्रवर्ग — मत्स्यव्यवसाय, सायबर कॅफे, ब्युटी पार्लर, ऑटो दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, उपाहारगृह, भाजीपाला विक्री, फळ विक्री, शिलाई, फोटोग्राफी इत्यादी

३. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (Personal Loan Interest Reimbursement Scheme)

बँकेकडून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांना नियमित परतफेडीच्या आधारे व्याज परतावा (रिइम्बर्समेंट) दिला जातो. PFMS मार्फत थेट लाभार्थी बँक खात्यात जमा.

तपशीलमाहिती
कमाल कर्ज रक्कमरु. १५,००,०००
व्याज परतावा१२% पर्यंत (नियमित बँक परतफेडीवर)
परतफेड कालावधीबँक मार्गदर्शक सूचनांनुसार
उत्पन्न मर्यादारु. ८,००,००० (नॉन-क्रीमी लेयर)
CIBIL गुणकिमान ५००
वितरणLOI (Letter of Intent) मंजुरीनंतर PFMS मार्फत
वय मर्यादा१८ ते ५० वर्षे

४. सामूहिक कर्ज व्याज परतावा योजना (Group Loan Interest Reimbursement Scheme)

५ किंवा अधिक सदस्यांच्या गटासाठी सामूहिक व्यवसाय कर्जावर व्याज परतावा. भागीदारी, सहकारी संस्था, बचत गट (SHG), LLP व कंपन्यांसाठी.

तपशीलमाहिती
कर्ज श्रेणीरु. १०,००,००० ते रु. ५०,००,०००
व्याज परतावा१२% पर्यंत (कमाल रु. १५,००,०००)
किमान गट सदस्य५ सदस्य
पात्र संस्थाभागीदारी, सहकारी संस्था, SHG, LLP, कंपन्या
वय मर्यादा१८ ते ४५ वर्षे
महास्वयम नोंदणीअनिवार्य (mahaswayam.in)

NBCFDC योजना (National Backward Classes Finance & Development Corporation)

महामंडळ NBCFDC, नवी दिल्ली यांचे अधिकृत राज्य वाहिनी संस्था (State Channelising Agency) आहे. खालील योजना NBCFDC मार्फत उपलब्ध:

योजनाकमाल कर्जव्याजदरविशेष तरतुदी
मुदत कर्ज योजना (Term Loan)रु. १०,००,०००६%कृषी, लघु उद्योग, कारागिरी, तांत्रिक, वाहतूक, सेवा क्षेत्र
मार्जिन मनी योजना (Margin Money)रु. १०,००,०००६%बँक कर्जासोबत मार्जिन मनी सहाय्य
शैक्षणिक कर्ज योजना (Education Loan)रु. ५,००,००० / वर्ष४%विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांसाठी
सक्षम कर्ज योजना (Sakshm Loan)रु. १०,००,०००६-८%व्यावसायिक शिक्षित बेरोजगार युवकांसाठी
शिल्प संपदा योजना (Shilp Sampada)रु. १०,००,०००६-८%कारागीर / हस्तकला व्यवसायिकांसाठी
नवीन स्वर्णिमा योजना (Swarnima — महिलांसाठी)रु. ७५,०००५%व्यावसायिक शिक्षित बेरोजगार महिलांसाठी
सूक्ष्म वित्त योजना (Micro Financing)रु. ५०,०००५%SCA/SHG मार्फत महिला लाभार्थींसाठी
महिला समृद्धी कर्ज योजना (Mahila Samridhi)रु. ५०,०००४%महिलांसाठी विशेष
कृषी संपदा योजना (Krishi Sampada)रु. ५०,०००४%लहान शेतकऱ्यांसाठी सवलतीचे कर्ज
प्रशिक्षण / कौशल्य विकास (Training/Skill Dev.)प्लंबिंग, दुग्धव्यवसाय, चामडे कार्य इत्यादी

टीप: सर्व योजनांच्या तपशीलवार अटी, पात्रता निकष व आवश्यक कागदपत्रांसाठी कृपया पात्रता व कागदपत्रे पृष्ठ पहा किंवा जवळच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधा.